
प्रशांत पाटील / संपादक अहिल्यानगर –
कोपरगाव तालुक्याच्या पुर्व भागातील वारी येथील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या वारी येथील स्मशानभूमीत ग्रामपंचायतीने नेऊन ठेवलेल्या १०० वृक्षांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. कोपरगाव पंचायत समितीने तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे मोठ्या संख्येने विविध प्रकारच्या झाडे पाठवलेली आहे .तरी प्रत्येक ग्रामपंचायतीला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. पंचायत समितीने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला एकुण किती झाडे पाठवलेली आहेत आणि त्यापैकी किती झाडांचे रोपण करून संगोपन करण्यात येत आहे.किती झाडे रोपण करणे बाकी आहे आणि उर्वरित झाडांची काय व्यवस्था करण्यात आलेली आहे. याचा संपूर्ण हिशोब ठेवणे गरजेचे आहे. वारी ग्रामपंचायतीकडे आलेल्या झाडांची अवस्था स्मशानभूमीत मरण यातना सहन कराव्या लागत आहेत.कारण या झाडाकडे लक्ष्य द्यायला कोणालाच वेळ नाही. त्यामुळे या झाडांना पाणी कोण देणार? आणि पाणी नाही मिळाले तर झाडे जगणार तरी कशी? असे अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. वृक्षारोपणाचे मोठमोठे कार्यक्रम होतात .पण वृक्षारोपण केल्यानंतर या झाडाकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही.तेव्हा उर्वरित झाडाकडे कोण लक्ष देणार ? हाही एक मोठा प्रश्न आहे.
Discussion about this post