यावेळी मोर्चास लहुजी पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांसह महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या पंचायत समिती मधील भ्रष्ट कारभारावर ताशेरे ओढत पुढे बोलताना ड.कांबळे म्हणाले की विधवा महिला ज्यांच्या घरात कर्ता पुरुष नाही अश्या महिलांची जाणीवपूर्वक आर्थिक पिळवणूक पंचायत समिती मधील अधिकारी यांच्या मार्फत केली जाते. घरकुल मंजूर करण्यासाठी व हप्ता बँकेत जमा करण्यासाठी ग्रामसेवक, कारकून दलित समाज्यातील लोकांकडून तीन हजार रुपयांची मागणी करत आहेत. दलित वस्ती साठी राखीव 15% निधी सरपंच ग्रामसेवक इतर ठिकाणी खर्च करून दलित वास्त्यांना विकासापासून वंचित ठेवत असुन अश्या भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्याचे काम गटविकास अधिकारी करत आहेत. घरकुल मंजूर असुन वाळू महाग मिळत असल्यामुळे घरकुल पूर्ण होत नाहीत अशी विदारक परिस्थिती घरकुल लाभार्थ्यांची झाली असल्याचे सांगत पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराचे अॅड. अभिषेक कांबळे यांनी निषेध केले..
Discussion about this post