रांजणगाव गणपती : प्रतिनिधी
रांजणगाव गणपती.ता.शिरूर येथील सर्व सामान्य कुटुंबांतील मच्छिंद्र विलासराव लांडे या युवकाची नुकतीच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क
पोलीस पदी निवड झाली. त्यानिमित्त रांजणगाव गणपती.ता.शिरूर पंचक्रोशीतील मान्यवरांनी त्याचा सत्कार
सभारंभ आयोजित करून मान्यवरांनी त्याचा सन्मान केला. मच्छिंद्र याने परिस्थितीची
जाणीव ठेवत आपल्या आई वडीलांचे व भावांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करत आई ‘वडिलांच्या दैनंदिन कामाला हातभार लावत दहावी पर्यतचे शिक्षण रांजणगाव गणपती गावात तर
बारावीपर्यतचे उच्च माध्यमिक शिक्षण पैठण येथून पूर्ण केले.उच्चशिक्षण पुण्यात करत असतानाच अधिकारी बनण्याचे
ध्येय उराशी बाळगून प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी ठेऊन अभ्यासाची तयारी केली.
त्याची नुकतीच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क पोलीस दलात निवड झाली हे ऐकून त्याच्या आई वडिलांना गहिवरून आले. मच्छिंद्र यांचे वडील भारतीय सैन्य दलात आपला सेवा कार्यकाल पूर्ण करत सेवानिवृत्त झाले आहेत.
मोठे भाऊ नवनाथ लांडे यांनी रांजणगाव गणपतीचे उपसरपंच पद भूषविलेले आहे तर दुसरे बंधु उद्योजक सोमनाथ लांडे हे उत्तम प्रकारे आपला व्यवसाय सांभाळत आहेत. दोन्ही भाऊ हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.
अधिकारी होणारच असे स्वप्न मच्छिंद्र यांनी बाळगले होते त्यासाठी ते नेहमी म्हणत आधी मी लग्न करीन तर वर्दीशी. भावांचे व वडिलांचे स्वप्न व ध्येय डोळ्या समोर ठेऊन हे स्वप्न
मच्छिंद्रने पूर्ण केले.त्याची ही जिद्द पाहून वडिलांसोबत अनेकांना यावेळी गहिवरून आले.
दरम्यान यावेळी बोलताना जिद्द ठेवून अभ्यास करत ध्येय बाळगले तर यश नक्कीच मिळते अशी प्रतिक्रिया मच्छिंद्र याने आपल्या मनोगतात व्यक्त केली. या वेळी त्याचा सन्मान करताना शिरुर नगरपालिकेचे मा. नगरसेवक विठ्ठलशेठ पवार, शिरूर तालुका ग्रंथालय संघ अध्यक्ष विवेकानंद फंड,महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल्स अध्यक्ष विकास शेळके,माजी उपसरपंच बाबासाहेब लांडे,भानुदास शेळके,आंबेगाव शिरूर विधानसभा मनसे उपाध्यक्ष बाळासाहेब कुंभार,ग्रां.पं. सदस्य अशोक शेळके,दिनेश लांडे,निलेशबापु लांडे,सुनिल लांडे,सुर्यकांत लांडे,कैलासराव लांडे,काळुराम लांडे,कानिफ शेळके,राजेंद्र लांडे,सोमनाथ फंड,रणजीत लांडे,ग्रामपंचायतीचे व विकास सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी,मच्छिंद्र यांचा मित्रपरिवार मोठ्याप्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलासराव बत्ते यांनी केले तर नवनाथ लांडे यांनी उपस्थित सर्वाचे मनापासून आभार मानले.
Discussion about this post