कडेठाण गावचे ग्रामदैवत श्री सांजोबा देवाची यात्रा उत्सव रविवार दि २० ऑक्टोबर व सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. रविवारी पहाटे ५.३०वा.सांजोबा देवाची पूजा होणार असून दुपारी १२.०० वा. सांजोबा देवाची मानाची काठी निघणार आहे.
सायंकाळी ६.०० वा. सांजोबा देवाची पालखी मिरवणूक फटाक्यांच्या व गुलालाच्या ढोल ताशांच्या अतिशबाजीत छबीन्याचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी सायंकाळी मंदिराजवळ करमणुकीचा बारा गावच्या बारा अप्सरा यांचा लावण्याचा कार्यक्रम होईल.
सोमवारी सकाळी ६.०० वा. पालखी वाजत गाजत गावातील हानुमान मंदिरामध्ये आणली जाते.सोमवारी सकाळी ९.०० वा कडेठाण जिल्हा परिषद शाळा याच्या आवारात करमणुकीचा रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा मंडळ यांचा हजेरीचा कार्यक्रम होईल.
दुपारी ३.०० वा. संजोबा देवाची पालखी छबीना पारंपरिक वाद्याच्या गजरात संपूर्ण गावात मिरवणूक होणार आहे. रात्री ८.००वा. रघुवीर खेडकर तमाशा मंडळाचा कार्यक्रम होईल. सदर यात्रा उत्सव हा सरपंच उपसरपंच चेअरमन व यात्रा कमिटीच्या मार्गदर्शनाने व तरुणांच्या सहकार्याने खेळी मेळीच्या वातावरणात आनंदात पार पाडला जातो.
Discussion about this post