प्रतिनिधी… नाशिक सह महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातलाय, नाशिक जिल्ह्यातल्या देवळा आणि चांदवड तालुक्याला पावसाने जोरदार झोडपलाय. एवढेच नाही तर नाशिकचं आता महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे . बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे आता पावसाचा गारपीटीची शक्यता वर्तुळण्यात आले आहे..
नाशिक जिल्ह्यातल्या देवळा आणि चांदवड व दिंडोरी सुरगाणा तालुक्याला मोठ्या प्रमाणात तिचा पाऊस झाल्याने धरण फुटले असून त्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे. विहिरी वाहून गेल्या तर धरण फुटल्याने ट्रॅक्टर सुद्धा पाण्यातून गेलाय.
चांदवड शहरातील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसल्याने अनेक व्यवसाय दुकानदाराच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये अवधूत पेस्ट साईट यांच्या दुकानात कमरा एवढं पाणी असल्यामुळे सर्व शेतीमालाचे औषधे पूर्णत, पाण्यात भिजवून गेली.
या अवधूत पेस्ट टीमचे संचालक अभिजीत शेंडगे लाखो रुपयांचा नुकसान झाल्याचा माहिती पत्रकारांना दिली आहे काल रात्री चांदवड शहरात व तालुक्यात ढगफुटी झाल्याने अतोनात नुकसान झालेला आहे. चांदवड शहरांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे पाण्यामध्ये गाड्या बुडाल्या दुकानांमध्ये पाणी घुसले. संजीवन विस्कळीत झाले आहे त. चांदवड ग्रामिण भागातही पावसाचा तडाका पाहायला मिळाला विजेच्या कडकडचा आणि ढगाच्या गडगड असतं चांदवड तालुक्याच्या परिसर दणाणून सोडला.
चांदवड पासून काय अंतरावर असलेल्या आहेर वस्ती येथील धरण फुटल्यानंतर त्याचं पाणी जे आहे ते प्रचंड प्रमाणात असल्यामुळे ट्रॅक्टर, विहीर, शेततळे हे वांग गेलेले आहे.
यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले ती परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला खरोखर पाऊस कशा पद्धतीने फोडतो हे लक्षात आलं आहे आज नाशिक जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस जोडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.
Discussion about this post