-*सावखेडा गावकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले अमोल शिंदे*पाचोरा- येथील सावखेडा बुद्रुक गावामध्ये ४ ते ५ दिवसापासून मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोची साथ पसरली असून संपूर्ण गावातील नागरिकांना गॅस्ट्रो व डायरिया सदृश्य त्रासाची लक्षणे जाणवत आहेत. गावांमध्ये होणारा दूषित पाणीपुरवठा त्यामुळे सदर साथ पसरल्याचे बोलले जात आहे.
संपूर्ण गावातील नागरिक या त्रासाने त्रस्त असून जुलाब, उलट्या,अशक्तपणा इत्यादी लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत सदर समस्या गावातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर कुठलाही विलंब न करता अमोल शिंदे यांनी थेट सावखेडा गाव गाठले व तात्काळ तेथून तालुक्याचे
प्रांताधिकारी,तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करून गावातील नागरिकांवर लगेचच उपचार सुरू व्हावे यासाठी प्रयत्न केले.सदर अधिकाऱ्यांनी देखील तात्काळ गावात उपस्थित राहून आरोग्य विभागाचे पथक त्या ठिकाणी उपलब्ध केले आणि स्थानिक नागरिकांवर गावातील शाळा व इतर ठिकाणी उपचार करण्यास सुरुवात झाली आहे.
तसेच इतर कुठलीही समस्या असल्यास तात्काळ संपर्क करा भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आपल्यासाठी 24 तास उपलब्ध राहतील. असे यावेळी अमोल शिंदे यांनी नागरिकांना आश्वासित केले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील तालुका सरचिटणीस बन्सीलाल पाटील मुकेश पाटील किरण पाटील आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Discussion about this post