गणेश राठोड
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :
सहकारमहर्षी भाऊसाहेब माने यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त कृषी विभाग, आत्मा.रेशीम विभाग यांचे शासन योजनेतून सहकार्य घेऊन व महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठाच्या संशोधित नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रगत झालेल्या शेतकऱ्यांचा कृषी संशोधन, शास्त्रज्ञ, कृषी विस्तार करणारे शास्त्रज्ञ अधिकारी कर्मचारी यांचा राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्मृतिदिनी 9 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे त्यासाठी राज्यस्तरावरून प्रयोगशील शेतकरी, संशोधन करणारे शास्त्रज्ञ,कृषी विस्तार करणारे शास्त्रज्ञ,
अधिकारी कर्मचारी तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रसार माध्यमांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते 9 जानेवारी 2025 रोजी सहकार महर्षी भाऊसाहेब माने यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त याही वर्षी दरवर्षीप्रमाणे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या अशा निवड झालेल्या शेतकऱ्यांचा राज्यस्तरावर पुरस्कार वितरण व सन्मान करण्याचे आयोजित केलेले आहे त्यासाठी पुरस्काराचे प्रस्ताव गटनिहाय निवड खालील प्रमाणे घेण्यासाठी ठरवले आहेत .
तरी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शिवारातील प्रयोगशीलतेला चालना देण्याचा उद्देश समोर ठेवून कमी खर्चात शेती पूरक उद्योग म्हणून दररोज पैसा प्राप्त करून देणारे उद्योग,शेडनेट, भाजीपाला, फुल शेती व हायटेक नर्सरी करणारे प्रगतशील शेतकरी कृषी संशोधन करणारे कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ,कृषी विस्तार करणारे कृषी शास्त्रज्ञ, अधिकारी,कर्मचारी, शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा शेतकरी महिलेने परिवाराच्या हितार्थ केलेली कृषीतील धवलक्रांती कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शेती क्षेत्रातील उद्योगनीय प्रसारमाध्यम, दूरदर्शन,रेडिओ, दैनिक पत्रकार, प्रसार माध्यमातील प्रतिनिधी तसेच जलसंवर्धन व वृक्षारोपण संस्था किंवा व्यक्ती राज्यस्तरीय निवड करून,
हा पुरस्कार मान्यवरच्या हस्ते प्रशस्तीपत्र,स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येईल त्यासाठीचे प्रस्ताव गटनिहाय संपूर्ण माहिती फोटो मागे नाव लिहून तीन पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर संपूर्ण पत्ता आधार कार्ड शासनाच्या संबंधित विभागाकडून प्रमाणित करून प्रस्ताव शेती मित्र अशोक वानखेडे अध्यक्ष भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान द्वारा कृषी महाविद्यालय उमरखेड जिल्हा यवतमाळ या पत्त्यावर दहा डिसेंबर 2024 पर्यंत पाठवावे असे आवाहन प्रतिष्ठान चे प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब ओझ लवार यांनी केले आहे.
Discussion about this post