विहिरगांव प्रतिनिधी – रजत चांदेकर
दहेगाव येथील विद्युत रोहित्राला अनेक वेळा शार्कसर्केट होऊन आग लागते असते . दिनांक १९/१०/२४ रोजी रात्री आठ वाजता वाजताच्या दरम्यान पुन्हा विद्युत रोहित्रामध्ये शार्कसर्केट होऊन आग लागली आगीचे लोंढे हे खाली पडत होते . त्यामुळे त्या परीसरात असलेल्या घरांना कधीपण आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.विध्युत रोहीत्र पेटण्याच्या अनेक वेळा घटना घडल्या असल्याने दहेगाव येथील ग्रामस्थांनी म.रा.वि .वि.कंपनीला लेखी निवेदन देऊन कळविण्यात आले परंतु अजुनपर्यंत नविन विद्युत रोहित्र बसविण्यात आले नाही . त्यामुळे आतातरी विद्युत वितरण कंपनीमध्ये दहेगाव येथील या गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन नविन विद्युत रोहीत बसविण्यात यावे असे दहेगाव येथील ग्रामस्थांची मागणी होत आहे
Discussion about this post