भूमिपुत्र आमदार प्रा.राम शिंदे साहेबांना विधानसभेची उमेदवारी काल जाहीर होताच पै.दत्ता शिंदे यांनी व कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त करत
आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या विजयाचा संकल्प केला .
यावेळी बोलताना ते म्हणाले , आपला तो आपलाच असतो .स्थानिक नेते , कार्यकर्ते यांच्या स्वप्नांचा आ.रोहित पवार यांनी केलेला भ्रमनिरास,दादागिरी,हुकूमशाही,दडपशाही, खुन्नसपणा यामुळेच आ.राम शिंदे यांना आपला तो आपलाच असतो असे म्हणत सर्व नेत्यांनी एकत्र येत प्रेमळ,शांत,संयमी,असलेल्या प्रा. राम शिंदे यांना साथ दिली भूमिपुत्र आ. राम शिंदे साहेबांनी मंत्री पदात केलेली विकासकामांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळीच ओळख निर्माण झाली.आमदार राम शिंदे साहेब यांची सर्वसामान्य जनतेबरोबर नाळ जुळली गेली आहे. मंत्री पदाच्या काळात त्यांनी मतदार संघाचा कायापालट केला. आपल्या कर्जत जामखेड मतदार संघातील भूमीसाठी गेली २० वर्ष केलेल्या अविरत कार्यामुळे आ. राम शिंदे साहेबांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली.कर्जत जामखेडचा भूमीपुत्र या नात्याने आपल्या भूमीच्या उत्कर्षासाठी कर्जत जामखेड मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आ.शिंदे साहेबांसाठी येणारे ३० दिवस वैयक्तिक जनसंपर्क करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Discussion about this post