शिवसेना नेते माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांचा राष्ट्रवादी अजित पवार
गटात प्रवेश
संतोष झंजाड
शिरूर:माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांनी अखेर मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे कटके हेच महायुतीचे उमेदवार असतील या शक्यतेला आता बळ मिळाले आहे.
माऊली कटके हे गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या वतीने उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते.यासाठी गेल्या अनेक दिवसापासून ते मुंबईत तळ ठोकून होते.राष्ट्रवादीच्या तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी कटके यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केला होता.याबरोबरच कटके हे गेल्या काही महिन्यांपासून ज्या पद्धतीने शिरूर हवेली मतदारसंघात सक्रिय झाले होते.
याचा विचार करता उपमुख्यमंत्री पवारांनी त्यांना पक्षात प्रवेश दिल्याचे बोलले जात आहे.कटके यांना धनुष्यबाणाची देखील ऑफर असल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन दिवसात कटके यांनी आपल्या समर्थकांची चर्चा करून अखेर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.निवडणूक जाहीर झाल्यापासूनच कटके यांनी मतदारसंघात प्रचार सुरू केल्याचे चित्र आहे.
काही झाले तरी निवडणूक लढवायचीच असा त्यांनी चंग बांधला आहे. मात्र पक्षाची उमेदवारी असल्यास त्याचा मोठा फायदा होईल. याची त्यांना जाणीव असल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी धडपड केली.यात ते यशस्वी झाले. शिरूर हवेली मतदारसंघाची जागा उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता असल्याने कटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असे दिसते.
Discussion about this post