
सुरत ही देशातील वस्त्रोद्योगाची राजधानी मानली जाते.परंतु तेथील उच्च वीजदरामुळे शेकडो वस्त्रोद्योग महाराष्ट्रात स्थलांतरित होत आहेत.प्रामुख्याने महाराष्ट्र -गुजराथच्या सिमेवरील नवापुर येथील औद्योगिक वसाहतीत २/३ महिन्यात गुजरातमधील मालकांचे १३० कारखाने उभे राहिले आहेत व ते स्वस्त विज दराचा लाभ घेत आहेत.
देशातील एकुण कापसापैकी ३० टक्के कापुन महाराष्ट्रात पिकतो.देशातील सर्वात जुने आयात निर्यात बंदरही महाराष्ट्रातील मुंबई बंदर आहे.भारतात अन्य कुठेही कापुन निर्यात होत नसतांना तो १५० वर्षांपूर्वी मुंबईतील बंदरातून होत होता.त्यामुळे एकेकाळी मुंबईशी संलग्न असलेल्या अन्य भागात वस्त्रोद्योग सुस्थितीत होता.दरम्यानच्या काळात उच्च वीजदरामुळे हा उद्योग माघारला होता.मात्र मागील वर्षी राज्य सरकारने वस्त्रोद्योग धोरण आखतांना उर्जा मंत्रालयांतर्गत महावितरणच्या माध्यमातून वस्त्रोद्योगासाठी स्वस्त विज देऊ केली.त्याचेच फायदे आता दिसुन येत आहेत.
राज्य सरकारने मागील वर्षी वस्त्रोद्योग धोरणांतर्गत या कारखान्यांसाठी कमी दाब व उच्च दाब मिळुन विविध ११श्रेणीतील कारखान्यांना सरासरी ३रूपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे.त्यानंतर गेल्या काही महिन्यांत गुजरातमधील छोटे वस्त्रोद्योग महाराष्ट्रात येऊ लागले आहेत.गुजरात सरकारने अलीकडेच वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे.त्यामध्ये केवळ नविन युनिट स्थापन करणाऱ्या कारखान्यांना विजदरात सवलत दिली आहे.जुन्या कारखान्यांना जवळपास साडे आठ रूपये प्रति युनिट दराने वीज घ्यावी लागणार आहे.अशा स्थितीत गुजरात व महाराष्ट्रातील विजदरात किमान ३रूपये प्रती युनिटची तफावत आहे.महाराष्ट्रातील विज दर स्वस्त असुन अनेक वस्त्रोद्योग यांनी नवीन जोडणी संदर्भात विचारणा केली असल्याचे महावितरणच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.
गुजरातमधील वस्त्रोद्योग महाराष्ट्रात येऊ लागल्याने त्याचा फायदा महाराष्ट्रातील कापुस उत्पादकांना होईल असा विश्वास विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी भाई राजेश इंगळे यांनी व्यक्त केला आहे.याबाबत बोलतांना ते म्हणाले की, महाराष्ट्रात असे वस्त्रोद्योग आल्यामुळे कापसाची मागणी वाढेल व महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ मिळेल.व त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळेल.कापसाच्या शेतीला प्रोत्साहन मिळुन विदर्भातील शेतीचा विकास होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होऊन राज्याचा विकास होईल.असा विश्वासही भाई राजेश इंगळे यांनी व्यक्त केला आहे.
Discussion about this post