सारथी काऊन्सिलिंग – ट्रेनिंग संस्थेचा उपक्रम
प्रतिनिधी : यश महाजन कल्याण
संपर्क :९९३०७५१२५७
जगभरात ऑक्टोबर महिना हा मानसिक आरोग्य महिना म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून कल्याणात प्रथमच “मेंटल हेल्थ फेस्ट”चे आयोजन करण्यात आले होते. या क्षेत्रातील अनुभवी मानसशास्त्र तज्ज्ञ कृपा राठोड यांच्या सारथी काऊन्सिलिंग – ट्रेनिंग संस्थेमार्फत आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला.
या कार्यक्रमाला कल्याण जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजा पातकर, कल्याण पश्चिम ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, महाराष्ट्र रेडिओलॉजीस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य मुन्ना तिवारी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
सध्या समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि वयोगटातील व्यक्तींमध्ये मानसिक अनारोग्याची समस्या निर्माण झाली आहे. शारीरिक दुखणे हे दिसते, पटकन लक्षातही येते. मात्र मानसिक आजार दिसतही नाहीत आणि लगेचच लक्षातही येत नाहीत. त्यासोबतच मानसिक आरोग्य आणि आजारांबद्दल अनेक चुकीच्या समजुतीही पसरल्या आहेत. याच समजुती आणि गैरसमज दूर करून लोकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सारथी काउन्सिलिंग संस्थेमार्फत त्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या सारथीच्या संस्थापक मानसशास्त्र तज्ज्ञ कृपा राठोड, कार्यकारी संचालक आशिष राठोड यांच्याकडून देण्यात आली.
कल्याण पश्चिमेतील साई चौकात झालेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत लोकांमध्ये मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. कृपा राठोड या गेल्या 15 वर्षांपासून मानस शास्त्र क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सारथी कौन्सिलिंग आणि ट्रेनिंग संस्थेच्या माध्यमातून त्या कल्याणात मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
Discussion about this post