-गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड.
सारथी महाराष्ट्राचा.
शेख मोईन (ता. प्र)
किनवट : आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर आपण व परिवारातील सर्व मतदारांना मतदान करायला प्रवृत्त करा. मतदान न केल्याने चुकीच्या व्यक्ती सत्तेत बसतात. तेव्हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या राज्याच्या व देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीला देखील आपलं ऐकावं लागेल यासाठी प्रत्येकांनी मतदान करावे.
असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांनी केले.
८३- किनवट मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली येथील बळीराम पाटील महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याच्या शुभारंभी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. प्राचार्य डॉ.एस.के. बेंबरेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी संपादक साजीद बडगुजर , पत्रकार आशिष देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वीप कक्षाचे शाहीर प्रो.डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी पोवाडा सादर केला. गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांनी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मतदान शपथ दिली.
याप्रसंगी स्वीप कक्षाचे सर्व सदस्य केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे , रुपेश मुनेश्वर , भूमच्या इंदुरवार , सुरेश पाटील , सारंग घुले, सचिन कोंडापलकुलवार , सूरज पाटील , यांचे सह डॉ.शुभांगी दिवे, डॉ.सुलोचना जाधव, प्रा.शेषराव माने, डॉ.लता पेंडलवाड, डॉ.गजानन वानखेडे, डॉ.स्वाती कुरमे, प्रा.अनिल पाटील, प्रा. ज्ञानेश्वर चाटे , प्रा.मुकाडे, प्रा.अनिल मुंढे, कार्यालयीन अधीक्षक यमुना कुमरे, दीपक खंदारे, मिलिंद लोकडे, सुधीर पाटील आदी उपस्थित होते. स्वीप कक्षाचे सदस्य उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमास नवमतदांसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
Discussion about this post