
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड: उमरखेड विधानसभा 2024 निवडणुकीच्या तयारीसाठी बंदी भागातील मित्र परिवाराची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक निंगनूर येथे आयोजित करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरखेड कार्याध्यक्ष प्रकाश भाऊ राठोड आणि बबलू भाऊ जाधव यांच्या पुढाकाराने, ज्येष्ठ नेते श्री मोहन बापू नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन बापू नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विचारमंथन करण्यात आले. या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश भाऊ जाधव (मार्केट कमिटी संचालक, उमरखेड) आणि अविनाश पाटील यादवकुळे (विधानसभा अध्यक्ष, महागाव-उमरखेड) उपस्थित होते.
बंदी भागातील जवळपास 22 गावांमधील जेष्ठ आणि नवयुवकांचा सहभाग होता. 400 ते 500 लोकांनी या कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली, ज्यात बंदी भागाच्या विकासासाठी विविध मुद्द्यांवर सखोल विचारमंथन झाले.
Discussion about this post