
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड: कैलास नगर बेलखेड येथे पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी हातभट्टी दारू बनवणाऱ्या आरोपीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात दारू निर्मिती साठा जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी नेहरू देवराव राठोड (वय 45 वर्षे) याने आपल्या घरी गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती उमरखेड पोलिसांना मिळाली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, मा. SDPO श्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि PI श्री पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस टीमने त्वरित कारवाई करत छापा टाकला.
छाप्यामध्ये 1200 लिटर सडवा मोहा, ज्याची अंदाजे किंमत 35 रुपये प्रति लिटर प्रमाणे ₹42,000 इतकी आहे, तसेच 25 लिटर गावठी हातभट्टी दारू मोठ्या कॅनमध्ये, ज्याची किंमत 100 रुपये प्रति लिटर प्रमाणे ₹2,500 आहे, असा एकूण ₹44,500 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांनी सडवा मोहा आणि अन्य रसायन जागेवरच नष्ट केले, जे दारू निर्मितीकरता वापरण्यात येत होते. या कारवाईमुळे गावात अनधिकृत दारू निर्मिती करणाऱ्या आरोपींच्या हालचालींना मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणी आरोपी नेहरू देवराव राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत मोठी यश मिळवले असून, या मोहिमेचे नेतृत्व करणार्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
यामुळे स्थानिक स्तरावर दारू निर्मितीविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम अजून तीव्र होण्याची शक्यता आहे.
Discussion about this post