
शिरोळ विधानसभा मध्ये होऊ घातलेल्या सध्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवार डोक्याला बाशिंग बांधून आम्ही कशा पद्धतीने समाजामध्ये कार्य करत आहोत याची जणू काही आरसा दाखवत सुटलेले आहेत पण समाजाभिमुख काम करणाऱ्या समाजामध्ये तेढ निर्माण न करणाऱ्या प्रत्येक समाजाला हक्क आणि न्याय मिळवून देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत आहोत अशी ग्वाही रमेश कांबळे यांनी सांगितले .
गेल्या पंचवार्षिक मध्ये सर्व समाजाभिमुख काम करत असताना सर्वच कार्यकर्ते यांच्याशी आम्ही बातचीत करून हा निर्णय घेतलेले आहे या निर्णयामधून आम्ही असे ठरवले आहे की बदल तर घडणारच आणि तो बदल देखील आम्हीच घडवणार असा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी केले .
यावेळी उपस्थित माजी जिल्हा महासचिव महादेव कुंभार माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश टोणपे माझी उपाध्यक्ष उदय कांबळे, माजी तालुका सचिव विजय माने, माझी तालुका उपाध्यक्ष अण्णासाहेब कांबळे, माझी उपाध्यक्ष मोहन माळगे , अकिवाट शाखाध्यक्ष डॉ. संजय कांबळे, माझी जिल्हा सचिव जयेश कांबळे तेरवाड शाखा अध्यक्ष प्रमोद वडर व अधिक कार्यकर्ते व सर्वसामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
Discussion about this post