सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेतील स्वच्छता निरीक्षकांना उपायुक्त वैभव साबळे याच्या शिस्तीचा प्रत्यय आला. याबाबत अधिक माहिती अशी कि स्वच्छता निरीक्षक यांना त्याचे युनिफॉर्म नेमून दिले आहेत मात्र कित्तेक वेळा सूचना देऊनही काही स्वच्छता निरीक्षक हे युनिफॉर्म न घालता आपल्या कामावर असतात याची गंभीर दखल घेत उपायुक्त वैभव साबळे यांनी तब्बल वीस स्वच्छता निरीक्षकांचा अर्धा दिवस हा खाडा धरला. महापालिका क्षेत्रामध्ये एकूण वीस प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात एक स्वच्छता निरीक्षक आहे याप्रमाणे एकूण वीस स्वच्छता निरीक्षकांना त्यांचे युनिफॉर्म दिलेले आहेत. मात्र युनिफॉर्म घालत नसल्याने उपायुक्तांच्या निदर्शनास आले त्याप्रमाणे वेळोवेळी सूचनाही दिल्या तरीही स्वच्छता निरीक्षकांनी दुर्लक्ष केल्याने अखेर उपायुक्त वैभव साबळे यांनी या वीस जणांना अर्धा दिवस खाड्याचा धरला. आणि यापुढे युनिफॉर्म न घालणाऱ्या स्वच्छता निरीक्षक यांना यापुढे संपूर्ण दिवसचं खाड्याचा धरला जाईल अशी तंबीही दिली. नागरिकांकडून वारंवार स्वच्छता निरीक्षकांच्या कामाबाबत तक्रारी नेहमी असतात यापुढे कामामध्ये कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही उपायुक्त वैभव साबळे यांनी दिल्या आहेत.
Discussion about this post