
शेतात कापणी केलेला मका आणि सोयाबिनला कोंब फुटून जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असुन यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला आहे
तर कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट होऊन जेमतेम उत्पादन होऊ शकेल अशी परिस्थिती असताना सततच्या संततधार पावसामुळे फुटलेला कापुस खाली लोंबकळून त्याला कोंब फुटले आहेत तर कैऱ्या काळवंडून सडत
आहेत त्यामुळे शेतकरी बंधूंचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असुन शेतकरी बांधवांचा या खरिप हंगामात बि बियाणे किटकनाशके खते यांच्यावर झालेला खर्च सुद्धा निघणे अवघड झाल्याने शेतकरी बांधव आर्थिक गर्तेत सापडला आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी बांधवांचे दिवाळे निघाले आहे.
माझी सरकारला यानिमित्ताने विनंती आहे आचारसंहिता शिथिल करून सरसकट ओला दुष्काळ जाहिर करून या संकटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहून शेतकरी बांधवांना आधार दयावा
तसेच बोदवड तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर शेतकरी बांधवांनी केळी पिकाची लागवड केली असून बोदवड तालुक्याचा केळी पिक विमा योजनेत समावेश करावा हि विनंती..
रोहिणीताईखडसे..
Discussion about this post