
उद्धव ठाकरेंकडून देण्यात आला एबी फॉर्म
प्रतिनिधी : यशवंत महाजन कल्याण
संपर्क : ९९३०७५१२५७
कल्याण पश्चिमेतून उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शहर प्रमुख सचिन बासरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमूख उध्दव ठाकरे यांच्याकडून बासरे यांना काल एबी फॉर्मही देण्यात आला. जून्या आणि निष्ठावंत शिवसैनिकाला पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कल्याणात शिवसेनेची घट्ट पाळेमुळे रोवण्यास ज्या ज्या शिवसानिकांनी महत्त्वाचे योगदान दिले त्यांच्यामध्ये सचिन बासरे यांच्याही नावाचा समावेश आहे. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे.
तर इतर जागांप्रमाणे कल्याण पश्चिमेतही निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी देण्याची आग्रही मागणी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केली जात होती. इतर पक्षातील काही जण शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत होते.
मात्र पक्षप्रमूख उध्दव ठाकरे यांनी पक्षातील निष्ठावंतावरच विश्वास दाखवत बासरे यांची उमेदवारी जाहीर केल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करणारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हा पहिला पक्ष ठरला आहे..
Discussion about this post