

प्रतिनिधी : यशवंत महाजन कल्याण.
संपर्क : ९९३०७५१२५७
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेनूसार आज राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थिती दर्शवली. इतकेच नाही तर उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना गाडीमध्ये बसवत राज ठाकरे यांनी स्वतः आपल्या गाडीचे सारथ्य केले.
2019 मध्ये आजच्याच दिवशी तत्कालीन विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आपण आमदार झालो होतो. आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि लकी आहे. राज ठाकरे पहिल्यांदा आपल्या आणि अविनाश जाधव यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः आले. आमच्या पाठीमागे राज साहेबांचा हात असून आम्ही अत्यंत आत्मविश्वासाने निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचेही राजू पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजू पाटील यांच्या समर्थकांनी मोठी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले..
Discussion about this post