
ना कसला गाजावाजा, ना कसले शक्तिप्रदर्शन…अतिशय साध्या पध्दतीने आज वसुबारस आणि रमा एकादशीच्या शुभमुहूर्तावर भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आणि विधानपरिषद आमदार चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत व पाचपुते कुटुंबावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या सोबतीने श्रीगोंदा-नगर मतदारसंघासाठी सौ. प्रतिभा (अक्का) बबनराव पाचपुते आणि श्री.विक्रसिंह (दादा) बबनराव पाचपुते यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल केला.
यावेळी तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री बबनराव पाचपुते, व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साधेपणाने अर्ज दाखल करायच्या सूचना असूनही बबनदादांवर प्रेम करणाऱ्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी आज बहुसंख्येने लावलेली उपस्थिती विजयाची नांदी ठरणार आहे..
Discussion about this post