वर्धा प्रतिनिधी:-रुपेश संत
*वर्धा :- विधानसभा निवडणूक शांततेत
पार पाडण्यासाठी पोलिस दल सज्ज झाले आहे. अशातच देवळी येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेला सराईत गुन्हेगार राजकुमार बेतनसिंग बावरी (२९, रा. सिखबेडा सावंगी) याला निवडणूक काळापर्यंत जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. आणखी पाच सराईतांचे प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
राजकुमार बावरी याच्याविरुद्ध शरीराविरुद्ध, जुगार, दारू विक्रीचे आदी विविध असे गंभीर प्रकारचे ५० वर गुन्हे दाखल आहेत.
आगामी विधानसभा
निवडणूक लक्षात घेता सावंगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडेय व गुन्हे शोध पथकांनी अशा सराईतांची यादी तयार करून त्यांचे तडीपारीचे प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविले आहेत .दरम्यान, राजकुमार बावरी याला सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून, त्याला नागपूर जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले.
दारू विक्री करणारे, अवैधरीत्या जुगार भरवणारे तसेच गुन्हेगारांची कुंडली पोलिसांनी जमा केली असून,अशांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे सावंगी पोलिसांनी सांगितले.
Discussion about this post