
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा ता.प्र.) तालुक्यातील कारखेडा येथे दि. २८ आक्टोंबर २०२४ रोजी शंकर गिरी महाराज मंदिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गव्हाळे गुरुजी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुनील दशमुखे वाशिम जिल्हा सेवाधिकारी. सोनुताई म्हातारमारे तालुका सेवाधिकारी मानोरा . माणिक महाराज पाटिल,रुपेश म्हातारमारे, अरुण भालदान, दुर्गे सेवाधिकारी, हे होते.
सदर पुण्यतिथी कार्यक्रमातत उपस्थित सर्व पुरुष महिला मंडळींना यावेळी राष्ट्रसंतांचे विचार हे अनुकूल असून हे प्रत्येक गावाततील नागरिक तसेच बालकापर्यंत पोहोचले पाहिजे तसेच गावात दररोज गुरु देवाची प्रार्थना चालू राहावी या हेतूने जय जय गावात शक्य झालं त्या त्या गावात जाऊन राष्ट्रसंतांचे विचार मांडण्याचा प्रचार प्रसार सुरू आहे.
त्यानिमित्ताने कारखेडा येथेही प्रार्थनेला प्रारंभ करण्यात आला आहे.
वरील कार्यक्रमाला अंबादास डोळस, विजय राऊत,वसंता म्हात्रे,राजेंद्र सोळंके,सुभाष जोशी,राहुल परांडे,वसंतराव सोळंके,सतीश देशमुख, प्रल्हाद डोळस, रितेश पाटील,रूपाली पाटील, वंदना पाटील,शीलाताई पाटील, रंजना पाटील रेणुका परांडे,रेणुका पाटील, शांताबाई भोयर,श्रेया पाटील, सुलोचना मात्रे,उर्मिलाबाई डोळस,व इतर पुरुष महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरील सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामभाऊ देशमुख यांनी केले तर आभार सोनूताई यांनी मानले.
Discussion about this post