

मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : गायवळ येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद शाखेचा उदघाटन सोहळा २८ आक्टोंबर २०२४ रोजी मोठ्या समाज बांधवांच्या संख्येत पार पडला आहे.
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या संघटनेचे समाजाप्रती काय कार्य आहे. आपण या संघटने मध्ये का काम केले पाहिजे. याची माहिती व्हावी.
आपले हक्क अधिकार ५ वी अनुसुचि, ६ वी अनुसूचि यांची जागृती का केली जात नाही. हे विशेष अधिकार आमच्या बांधवांना समजले तर काय होईल..
तसेच गोंडस शब्द लावून पेसा, वनसंरक्षक कायदा,CAA, सलवा जुडम असे बरेच काळे कायदे आणुन आमच्या आदिवासी बांधवांचा सत्यानाश करत आहे.
या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद शाखा गायवळचे अध्यक्ष गजानन भवाळ, उपाध्यक्ष सुभाष धोंगडे,प्रभुदास सातपुते, सचिवपदी सतीश मोखाडे, कार्याध्यक्ष संजय मस्के,कोषाध्यक्ष सुनील झळके,महासचिव प्रकाश व्यवहारे, सहसचिव अक्षय गोदमले, कार्यकारी सदस्य मंगेश मस्के सहकोषाध्यक्ष बाळू मस्के, तसेच कार्यकारी सदस्य योगेश कुरकुटे, राजेंद्र व्यवहारे, अशा प्रकारे सर्वांनुमते यांची निवड करून यांना यावेळी नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
वरील कार्यक्रमाचे उद्घाटक मा. मेश्राम जिल्हाध्यक्ष यवतमाळ, अध्यक्षता- मा. घनश्याम अलामे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद राष्ट्रीय महासचिव
मार्गदर्शक- मा. चिंतामण कळंबे, राज्य सदस्य राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद मा. गजानन गंडाळे,राष्ट्रीय युवा छात्र प्रकोष्ठ मा. उत्तम सोळंके राष्ट्रीय आदिवासी
एकता परिषद जिल्हा प्रभारी दिग्रस मा. आनंद खुळे,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद जिल्हाध्यक्ष वाशिम, मा. मरसकोल्हे,ता.अध्यक्ष कारंजा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद मा. मंगलाताई ढगे ,मंपीर, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद ता. अध्यक्ष खंदातेताई,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद ता. सदस्य मा. योगेश पारधी, गजानन गिऱ्हे, हे होते.
आयोजन-मा.सुजित भगत (बुदिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हा सह संघटक,वाशिम) , मा. दिनेश राऊत बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हा प्रभारी, मा. प्रमोद देवळे पश्चिम विर्दभ प्रभारी बुध्दीष्ट इंटरनॅशनल नेटवर्क व गायवळ वरील कार्यक्रमाला शेलूवाडा, खेर्डा, तपोवन,वाघोळा, दादगाव, तिवरी, सुकळी, किनखेड, गिर्डा, दिग्रस, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा येथील कार्यकर्ते मंडळी व तसेच सर्व गावकरी आदिवासी मंडळी तसेच विशेषता बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मस्के यांनी केले तर आभार सुजित भगत यांनी मानले.
Discussion about this post