ता. प्रतिनिधी -देविदास वायाळ -7798362011
बुलढाणा येथील चिखली रोडवरील वनविभागाच्या राणी बागेतील आज्ञात व्यक्तीनीं 3 चंदनाची झाडे कत्तल केल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास उघसकीस आले आहे.
उपवनसंरक अधिकाऱ्यांच्या कार्यालय व निवास्थानालगत असलेल्या राणीबाग मधील चंदनची 3 झाडांची आज्ञातांनी कत्तल करून चोरी केल्यामुळे बुलढाणा उपवनसंरक अधिकारी यांचेवर नामूस्की ओढवली आहे.
राणीबागेतील चंदनची झाडांची कत्तल झाल्याची बाब समाजसेवक गणेश सोनुने यांनी उघडकीस आणली आहे.
सोनुने यांना राणीच्या बागेतील चंदनाच्या झाडांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी राणीबागेमध्ये जाऊन पहिले.त्यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्या आदेशाने व परवानगीने राणीबागेत अडथळा येणारी झाडे तोडण्यात येत होती त्यावेळी सोनुने यांना 3 चंदनाची झाडे कत्तल झाल्याचे आढळून आले.
त्याबद्दल वनविभाग अनभिज्ञ् होते.
त्यावेळी आज्ञातांवर गुन्हा दाखल करून चोरट्याना अटक करण्याची व दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

Discussion about this post