शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील स्वाभिमानी तरुणांनी व ग्रामस्थांनी मा किसन चव्हाण यांचे केले जोरदार स्वागत. ..
*शेवगाव पाथर्डी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मा. किसन चव्हाण यांनी शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील मतदारांशी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी स्व लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरासमोरील सभामंडपात घोंगडी बैठक घेण्यात आली.
गोळेगाव मधील स्वाभिमानी तरुण मतदारांनी मा. किसन चव्हाण यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत केले. बैठकीला सर्व समाजातील तरुणांची उपस्थिती मोठया संख्येने होती.
यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल भाई, जिल्हा उपाध्यक्ष शाहुराव खंडागळे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोरुडे, संजय चव्हाण यांची भाषणे झाली. त्यानंतर वंचितचे उमेदवार प्रा. किसन चव्हान सर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
तसेच भावना व्यक्त करतांना गावातील तरुण म्हणाले की या पूर्वी गावात सगळेच उमेदवार येऊन गेले पण पंधरा लोकांपेक्षा जास्त लोक त्यांना जमावता नाही आली. परंतु किसन चव्हाण सर येणार म्हणून गावातील तरुण आतुरतेने वाट पाहत होते. आम्ही सगळ्या उमेदवारांपेक्षा चव्हाण सरांना गावातून एक तरी मत जास्त देऊ असा शब्दच तरुणांनी यावेळी दिला.
Discussion about this post