


खेड –
राजगुरूनगर | खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीसाठी ए प्लसचा मतदारसंघ असल्याचे सूतोवाच माजी मंत्री, शिवसेना नेते सचिन आहिर यांनी केले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक सर्व्हे झाले आहेत यामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या निवडून येणाऱ्या जागांपैकी खेड – आळंदी मतदारसंघ हा सर्वाधिक मतांनी निवडून येणार असल्याचे सर्व्हेमध्ये निदर्शनास आले असल्याचे मत शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी सांगितले.
दरम्यान खेड तालुक्यातील महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी निर्धार केला आहे की यावेळी या खेड आळंदी मतदारसंघातून महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून पाठवायचा आहे, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जिल्हा नियोजन बैठकीत देखील सर्वाधिक निधी याच मतदारसंघासाठी दिला जाणार असल्याचा विश्वास आहिर यांनी व्यक्त केला.
यावेळी उमेदवार बाबाजी काळे यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, निष्ठेने राहणाऱ्याला नक्की न्याय मिळतो त्याचमुळेच संपूर्ण पुणे जिल्ह्यात कोणाच्याही नशिबात ही मशाल आली नाही परंतु खेड – आळंदीच्या नशिबात ही मशाल आली आहे आणि मशाल आता घराघरात पोहचवून थेट विधानसभेत पाठवायची आहे त्यासाठी आपण आता प्रयत्न करायचे असल्याच्या सूचना माजी मंत्री सचिन आहिर यांनी उपस्थित शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिल्या.
Discussion about this post