
धाराशिव.भीम आर्मी चे भूम तालुका अध्यक्ष सुनील नागटिळक यांनी भीम आर्मी चे संस्थापक खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्या पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीचे परांडा 243 विधानसभेचे उमेदवार राहुल भैय्या मोटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यासाठी भीम आर्मी आझाद पार्टी च्या वतीने भूम येथे भीम आर्मी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी निरीक्षक महणुण भीम आर्मी आझाद
समाज पार्टी चे मराठवाडा अध्यक्ष विनोद जी कोल्हे साहेब धाराशिव जिल्हा अध्यक्ष अविनाश जी गायकवाड साहेब भूम तालुका अध्यक्ष सुनील नागटिळक उप अध्यक्ष अक्षय गायकवाड गोकुळ सातपुते विकास सरवदे आदी उपस्थित होते. या वेळी सुनील नागटिळक यांनी जातीवादी पक्षाला जर सत्ते बाहेर ठेवायचे असेल तर महा विकास आघाडीला पाठिंबा देणे किती आवश्यक आहे असे मत मांडले याला मराठवाडा अध्यक्ष विनोद जी कोल्हे व अविनाश जी गायकवाड यांनी अनुमोदन दिले आ राहुल भैय्या मोटे यांना पाठिंबा जाहीर केला.
Discussion about this post