



न्यूज प्रतिनिधी हरीश हजारे..
दि. 4नोव्हेंबर 2024
मनसेचे उमेदवार पप्पू पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा..
प्रखर हिंदुत्ववादाचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी सर्व अमरावती करांनी सायंस्कोर मैदान येथे उपस्थित राहण्याचे आवाहन..
निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेना सुद्धा अग्रेसर असल्याबाबत दिसत आहे त्यामध्ये अमरावती विधानसभेत मनसेचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांनी मराठी पत्रकार भवन या ठिकाणी तातडीची पत्रकार परिषद घेण्यात आली.त्यामध्ये अमरावती विधानसभेकरिता असलेल्या मनसेच्या उमेदवारांकरिता जाहीर प्रचार सभा दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सायंस्कोर मैदान या ठिकाणी सायंकाळी ६.०० वाजता असल्याबाबतचे पत्रकार परिषदेत सांगितले.. राज साहेब ठाकरे यांची सभा ऐकण्याकरिता सर्व महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी अत्यंत उत्सुक असून सर्व सामान्य जनतेला सुद्धा राज साहेब ठाकरे यांची सभा ऐकण्याची आतुरता आहे. सायंस्कोर मैदानी येथील सभेकरिता मोठ्या प्रमाणात जनसमुदाय राज साहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी येणार असून त्याकरिता जय्यत तयारी सुध्दा सुरू झालेली आहे.. पप्पू पाटील यांनी प्रचारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून राज साहेब ठाकरे यांच्या सभेने मोठ्या प्रमाणात वातावरण ढवळून निघणार आहे.. प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे राज साहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार
ऐकण्यासाठी सर्व अमरावतीकरांनी सायन्सकोर मैदान या ठिकाणी दिनांक ६ नोव्हेंबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये मनसेचे उमेदवार पप्पू पाटील यांनी केले..यावेळी पत्रकार परिषदेमध्ये विधानसभेचे उमेदवार पप्पू पाटील मनसे शहराध्यक्ष धीरज तायडे जनहित संघटक प्रवीण डांगे विद्यापीठ अध्यक्ष भूषण फरतोडे वाहतूक सेना जिल्हाप्रमुख रावेल गिरी कामगार सेना चिटणीस विकी थेटे शहर उपाध्यक्ष मयंक तांबूसकर शिव संभाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश उभाड वैदर्भीय नाथ समाज संघटनेचे विदर्भ प्रमुख स्वप्निल पाजनकर जिल्हा उपाध्यक्ष सचिन बावणेर सुनील गायकवाड प्रसिद्धीप्रमुख पवन सावरकर राज्य कार्यकारणी सदस्य सुशील पाचघरे विभाग प्रमुख अश्विन सातव व इतर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..
Discussion about this post