
हिंगनघाट:- राजकीय जीवनाच्या सुरुवाती पासून काँग्रेसचे निष्ठावंत पाईक म्हणून व नंतर शरद पवार यांनी काँग्रेस मधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काढला व नंतर शरद पवार – अजितदादा पवार यांच्यात फूट पडल्या नंतरही शरद पवार यांच्या सोबतची साथ कायम ठेवली. पक्ष् वाढीसाठी जीवापाड मेहनत केली. परंतु पक्षाने मागून आलेल्या नवीन चेहऱ्याला उमेदवारी देऊन अन्याय केल्याने माजी आमदार राजू तिमांडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर करीत सातव्यादा विधानसभेत जाण्यासाठी पक्षाशी बंडखोरी करीत एड सुधीर कोठारी व राजू तिमांडे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यासह शरद पवार यांना कायमचा राजकीय राम राम केला असून यंदा राजू तिमांडे यांना सुधीर कोठारी
यांची समर्थ साथ मिळणार असल्याने सोबत वर्धा जिल्ह्यातील राजकीय चाणक्य म्हणून ओळखल्या जाणारे ज्येष्ठ सहकार नेते सुधीर कोठारी यांची भक्कम साथ मिळणार असल्याने या मतदार संघात महाविकास आघाडी समोर गंभीर संकट उभे राहिले असून महायुतीत आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याचे दृष्य दिसत आहे.या मतदार संघातील लढत ही दुहेरी ऐवजी तिहेरी होईल असे प्राथमिक चित्र दिसत आहे. महायुती व महाविकास आघाडी या दोनच पक्षात या मतदार संघात तुल्याबळ लढत होणार अशी सुरुवातीपासून राजकीय पंडिताचा होरा होता. परंतु भाजपात एकच उमेदवाराची चर्चा होती तर राका (शरद पवार) गटात एड सुधीर कोठारी, राजू तिमांडे, हा एक गट व दुसरा अतुल वंदिले यांचा असे दोन गट पडले. पक्ष स्थापने पासून आपण पक्षात जेष्ठ असल्याने तिमांडे किंवा कोठारी या दोघां पैकी एकालाच उमेदवारी द्यावी अशी या दोघांची मागणी होती. Sudhir Kothari-Raju Timande परंतु पक्षात एक वर्षा पूर्वी आलेल्या अतुल वांदिले यांनी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांचे बोट धरून थेट जयंत पाटील
यांच्याशी संधान बांधून उमेदवारी पदरात पाडून घेतली खरी पण या दोन नेत्यां सोबत कायमचा दुरावा घेत मतदार संघात आता कोणताही संपर्क नसलेल्या सुनील राऊत यांना हाताशी धरून प्रथम ग्रासे माक्षिका पात करून घेतला. ज्येष्ठ सहकार नेते सुधीर कोठारी – माजी आमदार राजू तिमांडे यांना महत्व न देण्याचा परिणाम म्हणजे आज पक्षात व महाविकास आघाडीत पडलेली उभी फूट दिसत आहे. या आघाडीतील दुसरा घटक पक्ष असलेल्या उबाठा पक्षाचे नेते व माजी नगरसेवक विठ्ठल गुळघाणे यांनीही अपक्ष उमेदवारी जाहीर करून महाविकास आघाडी समोर एक आव्हान उभे केले आहे..
Discussion about this post