राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आधीच भेट दिली जाणार आहे.
महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आंनदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. राज्यभरात आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज देखील केला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की, सरकार त्याआधीच महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा करणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Discussion about this post