गणेश राठोड,
तालुका प्रतिनिधी उमरखेड..
उमरखेड:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मा.आ. राजेंद्र नजरधने यांचे हस्ते मतदारसंघातील शेकडो भाजपा कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश सोहळा दिनांक 01 नोव्हेंबर रोजी संजोग भवन येथे पार पडला यावेळी मा. आमदार राजू नजरधने यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.
महायुती मध्ये अनेक वर्षं निष्ठावंत राहिलेले माजी आमदार राजेंद्र नजरधने आघाडीवर असताना त्यांना उमेदवारी न देता नवख्या चेहऱ्याला उमेदवारी देण्यात आली यामुळे मागील 20वर्षं निष्ठावंत असलेले राजु नजरधने यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवून अर्ज दाखल केला.
विधानसभा 2014 मध्ये राजू नजरधने यांनी 50हजार मतांची लीड मिळवत विजय प्राप्त केला. मतदार संघात जणसामान्य ओळख असणारे, आपल्या कामातून जनतेला न्याय देणे अशी माजी आमदार राजू नजरधने यांची ओळख. राजू नजरधने यांच्या मनसे प्रवेशाने महाराष्ट्र सैनिकांत उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले.
त्यांच्या विचारावर प्रेरित होऊन मतदार संघात असणाऱ्या शेकडो भाजपा तसेच अन्य कार्यकर्त्यांनी दिनांक 01नोव्हेंबर रोजी संजोग भवन येथे मनसेचा झेंडा हाती घेतला.
यावेळी मनसे चे उमेदवार मा.आ.राजू नजरधने, जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार, जिल्हा उपाध्यक्ष डेव्हिड शहाणे, सादिक शेख, संजय बिजोरे, सुनील चव्हाण, महेश कामारकर, प्रविण कनवाळे, प्रकाश शिंदे, संदीप कोकाटे, दत्ता पिलवंड सह सर्व मनसे पदाधिकारी व शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..
Discussion about this post