सध्या जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत असून काही रुग्णालयांमध्ये तर रक्त बाहेरून विकत आणावे लागते. मात्र कित्तेक रक्तपेढ्यांमध्ये सध्या काही गटांचे रक्त अपुरे आहे. मिरज मधील प्रतिष्ठित नागरिक आणि पद्मावती शांतीसेवा फौंडेशन चे सर्वेसर्वा विवेक शेटे यांनी गेल्या आठरा वर्षांपासून सलग रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्ताच्या तुटवड्याची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक शिबारामध्ये शेकडो रक्तदाते रक्तदान करतात. यंदाही रक्तदात्यांचा महामेळा येत्या ११ नोव्हेंबर रोजी मिरजेतील पाटील हौद येथील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदीर,आशा टॉकीजच्या मागे,मिरज. येथे भरणार असून जास्ती जास्त संख्येने नागरिकांनी आणि रक्तदात्यांची रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी दृढ करावी असे आवाहनही विवेक शेटे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे. या महामेळ्यात प्रत्येक वर्षी शेकडो बाटल्या विविध गटाच्या रक्ताचे संकलन होत असते. यंदाही हा आकडा पार होईल अशी अपेक्षा आहे. .
Discussion about this post