
पाईट, राजगुरूनगर | खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्यावर टीका करताना वारकरी आणि माळकरी आहे परंतु भजन, हरिपाठ म्हणता येत नाही अशा प्रकारे अवहेलना केली होती त्यावर प्रतिउत्तर देताना काळे यांनी मोहितेंचा खरपूस समाचार घेतला आहे.
दरम्यान बाबाजी काळे यांचा पश्चिम भागात प्रचार दौरा सुरू असताना पाईट येथे कोपरा सभा पार पडली यावेळी बोलताना बाबाजी काळे म्हणाले की, माझ्या गळ्यात माळ आहे तुमच्या गळ्यात आहे का हे अगोदर स्पष्ट करा. माळकऱ्याला अभंग, हरिपाठ यावा लागतो, भजन यावा लागते असा सवाल विरोधी उमेदवाराने उपस्थित केला. माझे आवाहन आहे की, चला माझ्या सोबत बसा मंदिरात मी पुढे हरिपाठ, अभंग म्हणतो तुम्ही माझ्या मागे फक्त हरिपाठ म्हणून दाखवा केवळ सर्वसामान्य माणूस समोर आहे म्हणून टीका करायचं काम तुम्ही करता.
त्याचबरोबर मोहिते यांनी यापूर्वी टीका करताना बाबाजी काळे हे ताकदीचे उमेदवार नाही अशी टीका केली होती त्यावर बाबाजी काळे बोलताना म्हणाले की, माझ्या आर्थिक परिस्थितीवर टीका केली जाते, मान्य आहे मला की कोणत्याही प्रकारे अवैधरित्या पैसे कमवले नसतील, मान्य आहे मला मी कोणाच्या जमिनी घेऊन अधिक पटीने विकल्या नाही, एमआयडीसीतून मी मलिदा कमवला नाही, मोठ्या मोठ्या विकास कामात मी टक्केवारी मिळवली नसेल परंतु सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद आहे. त्यामुळे येत्या २० तारखेला विध्यमान आमदारांना घरी पाठवणार आहे.
Discussion about this post