
परंडा तालुका प्रतिनिधी – दत्तात्रय खोबरे..
परंडा तालुक्यातील डोणजे विद्यालय डोणजे येथे तब्बल २७ वर्षानंतर १९९७ च्या १० वी च्या बॅचमधील सध्या विविध क्षेत्रात काम करत असणाऱ्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेहमेळावा दि.५ नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांच्या वतीने कृतज्ञता गुणगौरव प्रमाणपत्र देऊन गुरुजनांचा सन्मान करण्यात आला तर विद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या मिळाव्यासाठी १९९७ च्या बॅचचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक लक्ष्मण निळ सर, नरसिंग ढास सर ,निवृत्ती शिंदे सर ,अंकुश मुळूक सर, नानासाहेब काकडे सर, अनंत सूर्यवंशी सर ,आप्पासाहेब सूर्यवंशी सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बॅचच्यावतीने सर्व गुरुजनांना कृतज्ञता गुणगौरव सन्मानपत्र देण्यात आले. उपस्थित सर्व वर्गमित्र व वर्गमैत्रिणींना गुरुजनांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. वर्ग मैत्रिणींना वर्ग मित्रांच्या वतीने गिफ्ट वस्तू देण्यात आल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय श्री .भीमा तात्या खरसडे संचालक डोंजे विद्यालय डोंजे, कवीवर्य किरण विभुते सर, सन्माननीय श्री पडघन सर मुख्याध्यापक भैरवनाथ विद्यालय कंडारी, विजयकुमार उबाळे ,ज्योतीराम घोगरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविकामध्ये कविवर्य किरण विभुते सर यांनी आई विषयी आईचे स्थान आणि गुरुचे स्थान एकच आहे याविषयी कविता सादर केली. ह.भ.प. अनंत सूर्यवंशी सर यांनी विद्यार्थी हे सोने आहे आणि त्यांना घडविणारा शिक्षक हा कारागीर आहे असे सांगत समर्पक उदाहरण देऊन गुरु शिष्यांचा नात्यांची महती स्पष्ट केली.
ज्योतीराम घोगरे सर यांनी गुरु विषयी कृतज्ञता सोहळा आयोजित केल्याबद्दल या १९९७ बॅचचे अभिनंदन केले. क्षीरसागर सर यांनी संस्थेच्या उभारणीपासून या संस्थेचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत याचा आम्हा शिक्षकांना अभिमान आहे. असे सांगितले तर नरसिंग ढास सर यांनी ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी’ या संत तुकाराम महाराजांच्या वचनाचा आधार घेत धन सन्मार्गाने कष्टाने कमवावे तरच आपल्याला खरी सुखाची झोप लागत असते. असे सांगितले यावेळी वर्गमैत्रिणी कांता, दैवशाला, अनिता, चंद्रकला, संगीता उपस्थित होत्या.
गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन परत एकदा सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा तास अनुभवला .सर्वांनी आपापल्या संसाराविषयी व गुरुजनाविषयी आपले अनुभव सांगितले. तसेच गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर आम्ही सर्वजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात यशस्वी आहोत. आजचा हा दिवस गुरुजनांना भेटण्याचा पर्वणीचा दिवस आहे आणि यापुढे मित्रांच्या एकमेकांच्या सुखदुःखामध्ये कायम असेच भेटत राहू. अशा भावना मनोगतात व्यक्त केल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पासाहेब घोगरे, संतोष सिरसट , बिभिषण घोगरे,अनिल पाटील, विजय पाटील ,कुंडलिक कुंभार , भारत चव्हाण,विलास कुंभार ,नानासाहेब ढेंबरे ,लहू बनसोडे, कुंदन बोराडे ,डॉ. आण्णासाहेब सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार बाळासाहेब घोगरे सर यांनी मांनले. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली..
Discussion about this post