
(वनविभाग व स्वाब संस्थेद्वारे पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित)
सिंदेवाही:
5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या आठवड्यात मारुती चितमपल्ली व सलीम अली या दोन प्रसिद्ध पक्षी तज्ञ व पक्षीमित्र यांच्या 2 व 5 नोव्हेंबर ला असलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वनविभागाद्वारे या आठवड्यामध्ये पक्षी सप्ताह संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासंदर्भाने आज 7 नोव्हेंबर रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील सिंदेवाही येथे पक्षी सप्ताह साजरा..
(वनविभाग व स्वाब संस्थेद्वारे पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित)
सिंदेवाही:
5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या आठवड्यात मारुती चितमपल्ली व सलीम अली या दोन प्रसिद्ध पक्षी तज्ञ व पक्षीमित्र यांच्या 2 व 5 नोव्हेंबर ला असलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वनविभागाद्वारे या आठवड्यामध्ये पक्षी सप्ताह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासंदर्भाने आज 7 नोव्हेंबर रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील थकाबाई तलाव परिसरात सकाळी 6 ते 11:30 वाजेपर्यंत पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
लोकांमध्ये पक्षी व त्यांचे महत्त्व पोहोचण्याकरता वनविभाग शाळा , कॉलेजेस किंवा इतर विद्यार्थ्यांना , जिज्ञासू लोकांना आपल्या परिसरातील पानवठे किंवा इतर ठिकाणी पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने पक्षी निरीक्षणा करिता फिरवून त्यामध्ये विविध पक्षांची नोंद, पक्षांबद्दलची माहिती , पक्षांबद्दल चे पर्यावरणात असलेले महत्त्व समजून सांगण्याकरता पक्षी तज्ञांना व पक्षी निरीक्षकांना बोलवून या कार्यक्रमांचे आयोजन केले.
या निरीक्षणाच्या सुरुवातीलाच 3 मोरांचे दर्शन झाल्यामुळे पक्षी निरीक्षणाबद्दल उत्सुकता वाढली त्यानंतर हरियाल, धनेश यासारख्या अनेक 32 विविध पक्षांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली. तर पक्षांच्या विविध प्रजाती व त्यांची ओळख यासंदर्भाने विद्यार्थ्यांना व उपस्थित त्यांना पक्षी दाखवून त्यांच्या नोंदी टिपण्या करता डब्ल्यू.पी.एस.आय.चे रोशन धोत्रे, पक्षी निरीक्षक अक्षय मेश्राम, स्वप्निल मेश्राम या पक्षी निरीक्षकांनी मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रमा मध्ये पक्षी व त्यांचे पर्यावरणातील महत्त्व याबाबत सिंदेवाही चे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, यांनी मार्गदर्शन केले
नितीन गडपायले, क्षेत्र सहाय्यक सिंदेवाही यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाकरिता ‘ज्ञानधारा अकॅडेमी सिंदेवाही’ चे महेश लेनगुरे सर यांच्या नेतृत्वात विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळेस सिंदेवाही येथील वन कर्मचारी सेमस्कर वनपाल, चौखे वनपाल, पेंदाम वनरक्षक, जावळे, चिंचोळकर , श्री राठोड वनरक्षक, श्री धनविजय हे वनरक्षक तर स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख जिवेश सयाम, वन्यजीव प्रमुख छत्रपती रामटेके, सहसचिव हितेश मुंगमोडे , अमीर करकाळे, विनोद लेनगुरे, गणेश गुरमुले, सुमित गुरनुले, अमन करकाडे, साहिल सेलोकर, इत्यादी उपस्थित होते..
Discussion about this post