धर्माबाद तालुका प्रतिनिधी चैतन्य घाटे…
धर्माबाद-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेत मतदानाला अन्यसाधारण महत्त्व असून आपल्या आ
अंतरआत्म्यास स्मरुन योग्य उमेदवारांना आपले अमूल्य मत निवडणुकीत देताना आपापसात भेदभाव वाढू नये, वैमनस्य वाढू नये यासाठी हे मतदान अगदी गुप्त ठेवल्यामुळे ते बिनधास्त करू शकता! त्यामुळे आज घडीच्या राजकारणामध्ये मतदानामध्ये जे वातावरण जाणून बुजून तयार केल्या जात आहे त्यामध्ये आपापले संबंध जपणे ही काळाची गरज आहे.
सध्या सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवाराच्या चर्चा रंगत आहेत.
नायगाव विधानसभा मतदार संघही या चर्चेपासून वेगळा नाही. नायगाव विधानसभा मतदारसंघातील नायगाव उमरी व धर्माबाद या तीनही तालुक्यात सध्या निवडणुकीचा जोर अगदी पराकोटीला गेला आहे. गटातटाचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. त्यामुळे आपापसातील स्नेह संबंध दुरावत आहेत. आज घडीला विद्यमान आमदार राजेश पवार हे भारतीय जनता पक्षातर्फे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत असून 2019 ची निवडणूक जिंकल्यानंतर कोरोना या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर आमदारकीचे अडीच वर्षे अगदीच कोरे गेल्याच्या नंतरही नंतरच्या अडीच वर्षात त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी काय केले हे अगदी घराघरात पोहोचले आहे. व जनतेला सर्व सूर्यप्रकाशाएवढे माहीत झाले आहे. दुसरे उमेदवार हे काँग्रेसचे असून डॉ. मीनल ताई खतगावकर ह्या माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई नायगाव मतदार संघातून आपले भाग्य आजमावत आहेत. त्या जरी उच्चशिक्षित असल्या तरी त्यांच्यापेक्षा त्यांचे सासरे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्याच गेल्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीतील कार्याचे मूल्यमापन जनता करीत आहेत.
तर तिसरे प्रमुख उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीचे असून पेशाने डॉक्टर असले तरी कर्मधर्म संयोगाने ते निवडणुकीत आपले भाग्य आजमावत आहेत.नायगाव व धर्माबाद तालुक्यापेक्षा उमरी तालुक्यातील जनता त्यांच्या डॉक्टरी या कार्यशैलीला सुपरीचीत आहेत. या तीन प्रमुख उमेदवारा व्यतिरिक्त इतर सात उमेदवार ही निवडणुकीच्या रिंगणात असून एकूण दहा उमेदवार नायगाव विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत.त्यामुळे कुणाला मतदान करावयाचे आहे हे जनतेला चांगलेच माहित असले तरी खुले आम गटातटाच्या राजकारणात सर्वसामान्य जनता उतरत आहे की त्यांना उतरल्या जात आहे? हा ग्रहण प्रश्न सर्वांच्या आत्मपरीक्षणाचा आहे. निवडणुका या येतात आणि जातात. आज घडीला राज्यभर विधानसभेच्या निवडणुकीचे वारे दिवसागणित जोर भरत असले तरी येणाऱ्या 20 नोव्हेंबर पर्यंत वाद प्रतिवाद, आरोप प्रत्यारोप हे टोकाला जाऊ नये,हे सर्व मर्यादित असावे, सर्व जनतेने आपले सामाजिक कौटुंबिक वैयक्तिक संबंधांना ठेच पोहोचेल असे सदरील राजकारणात वर्तन करू नये, निवडणूक लढणारे उद्या जय पराजय झाला तरी मांडीला मांडी लावून बसतील पण आपल्या मित्रांशी परिवारांशी आपल्या सामाजिक जीवनाशी झालेल्या वाद विवादाशी आलेले वितुष्ट याची साधी दखलही ते घेणार नाहीत. त्यामुळे उमेदवाराबद्दल आत्मपरीक्षण करणे, कोणता उमेदवार योग्य आहे हा आपला अतरात्मा सांगतो त्यानुसार त्या उमेदवाराला मतदान करणे व त्याचा उहापोह न करणे हे महत्त्वाचे असून मतदान हे अगदी गोपनीय असल्यामुळे आपले मतदान कोणाला गेले याची काळजी दुसऱ्यांसाठी करणे योग्य राहणार नाही. त्यामुळे आपापले संबंध जपणेच योग्य राहील. व ती काळाची गरजही आहे..
Discussion about this post