अंकलखोप, ता. ८ शब्दसूर
साहित्य व सांस्कृतिक मंच व राजेश
चौगुले फाउंडेशनतर्फे मराठी भाषेला
‘अभिजात दर्जा’ मिळाल्याबद्दल व
मराठी रंगभूमी दिनानिमित्त ‘स्वरगंध’
प्रस्तुत अवीट मराठी गीतांचा ‘मायबोली
दीपसंध्या’ बहारदार कार्यक्रम नुकताच
झाला.
‘सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी
संस्था राजेश चौगुले फाउंडेशनतर्फे
आयोजित ‘किल्ले बांधणी स्पर्धा
२०२४’ चे बक्षीस वितरण मान्यवरांच्या
हस्ते झाला.
वैयक्तिक विभागात प्रथम राजवीर
सुशांत सूर्यवंशी, द्वितीय क्रमांक
-गौरवी प्रमोद सूर्यवंशी, तृतीय
अंकलखोप: राजेश चौगुले फाउंडेशनच्या वतीने आयोजित किल्ला स्पर्धेतील
विजेत्यांना बक्षीस वितरणप्रसंगी उद्योजक राजेश चौगुले, शीतल चौगुले, सुभाष
कवडे व अन्य मान्यवर,
अथर्व अभिजित गुरव, उत्तेजनार्थ
- सोहम सतीश पाटील व सोहम संदीप
कोळी, अनुक्रमे ३. २ व १ हजार
रकमेसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र
देण्यात आले.
सांधिक विभाग प्रथम ऐक्य
गणेश मंडळ, द्वितीय स्फूर्ती गणेश
मंडळ, तृतीय बसवेश्वर गणेश मंडळ
यांना अनुक्रमे ७, ५ व ३ हजार रुपये
रकमेसह सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
देण्यात आले. सिद्धेश्वर गणेश उत्सव
मंडळ, शिव साम्राज्य गणेश मंडळांना
सहभागाबद्दल प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह
देऊन गौरविण्यात आले.
राजेश चौगुले फाउंडेशनच्या
अध्यक्षा सौ. शीतल चौगुले यांनी दहा
वर्षांतील कार्याचा आढावा घेतला.
वृक्षारोपण व विविध सामाजिक
उपक्रमांची माहिती दिली. हा कार्यक्रम आयोजित करून एक प्रकार मराठी भाषेला सलाम करता आहात अभिवादन करता आहात तसेच
“ज्यांचे हात आकाशाला टेकलेले
असतात, पण पाय जमिनीवर असतात,
अशी माणसे समाजाची गरज आहे.
स्वतः सक्षम असताना समाजातील
उपेक्षितांना समृद्धी देण्यासाठी सक्षम
हात समाजात निर्माण व्हावेत.
जे सामाजिक काम येथील राजेश
चौगुले फाउंडेशनमार्फत सुरू आहे.
ते महाराष्ट्राला आदर्शवत आहे,”
असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक
व ‘शब्दसूर’चे अध्यक्ष सुभाष कवडे
यांनी केले,
किल्ल्यांचे परीक्षण करणारे सूरज
चौगुले, सुबोध वाळवेकर यांच्यासह
मान्यवरांचा सत्कार झाला. विजेत्या
मंडळांच्यावतीने सौ. प्रणाली पाटील
यांनी सलग तीन वर्षे स्पर्धा आयोजित
केली व मुलांना किल्ले बांधणीसाठी
प्रवृत्त केले.
एव्हरेस्ट मोहीम यशस्वी
केल्याबद्दल डॉ. उमेश चौगुले यांचा,
सत्कार झाला. आप्पासाहेब पाटील
यांनी सूत्रसंचालन केले. ‘स्वरगंध’चे
शशिकांत हजारे, फाउंडेशनचे
उपाध्यक्ष राजेंद्र कुंभार, सचिन चौगुले,
आप्पासाहेब सकळे, विकास सूर्यवंशी,
‘शब्दसूर’चे उपाध्यक्ष राजेंद्र खामकर,
सचिव प्रसाद कोळी, अनिल विभुते,
बाळासाहेब मगदूम, महेश चौगुले, प्रदीप
करजगार, वैभव यादव, सतीश यादव
यांनी संयोजन केले..
Discussion about this post