लोहा,
कंधार तालुक्यातील बाचोटी येथे गुरुवारी दि. ७ रोजी सायंकाळी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यातील गाड्यावर कांहीं समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. तसेच तत्पूर्वी वाका येथे देखील वंचित बहुजन आघाडी प्रचारातील वाहनावर हल्ला चढवला होता. त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून हल्लेखोरांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी संबंधित प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लोहा शहरातील वंचित बहुजन आघाडी कार्यालयात शुक्रवारी दुपारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे लोहा विधानसभेचे उमेदवार शिवकुमार नरंगले, ओबीसी तालुका समन्वयक माऊली गीते, वंचितचे तालुकाध्यक्ष प्रमोद धुतमल, माळाकोळीचे माजी सरपंच प्रतिनिधी जालिंधर महाराज कागणे, ओबीसी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत चिंतेवार कंधार शहर अध्यक्ष आदींची उपस्थिती होती.
वंचित बहुजन आघाडीचे शिवकुमार नरंगले यांनी लोहा कंधार मतदारसंघात सुरू असलेल्या वंचित ओबीसी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदवावा..
Discussion about this post