आजरा – प्रतिनिधी
राजेंद्र गड्यानावर –
चंदगड तालुका खरेदी विक्री संघ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अव्वल आहे. शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नेते राजेश पाटील आहेत. सध्याच्या घडीला राजेश पाटील आघाडीवर असले तरी गाफील राहू नका. पैशाच्या जोरावर विकत घेवू पाहणाऱ्यांना वेळीच चपराक द्या.स्वतःचे मत विकून गुलाम होण्यापेक्षा लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची हिम्मत ठेवा.
जयसिंग चव्हाण –
महायुती सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणींची उपस्थिती पाहता मतरूपाने भावाला पाठिंबा देतील.विक्रमी मते राजेश पाटील घेतील अशी आशा व्यक्त करतो.
संग्रामसिंह कुपेकर-
महायुतीच्या सरकारने महिलांचा, शेतकऱ्यांचा सन्मान केला.राजेश पाटील हे तालुक्यातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे.तालुका चुकीच्या दिशेला जाऊ नये म्हणून राजेश पाटलांसोबत आहे. केलेल्या कामाची पोच पावती म्हणून राजेश पाटील यांना पुन्हा एकदा निवडून देऊ.घड्याळ हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवा,असे आवाहन यावेळी करतो.
राजेश पाटील-
या भागातील मूलभूत गरजा ओळखून मी विकास कामे केली आहेत.माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजित दादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कर्नाटकातील भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी मी पाठपुरावा केला. त्यामुळे राज्यातील सर्व कर्नाटकहून आलेल्या विवाहित भगिनींना लाभ मिळत आहे.या प्रकारची अनेक विधायक कामे करता आली. येणाऱ्या २० तारखेला घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून महायुतीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी.
यावेळी, लता लाटकर, राजू कलगुटगी, अरुण लाटकर, जयकुमार मुन्नोळी, महाबळेश्वर चौगुले, सुदर्शन बाबर, सागर मांजरी, अभय देसाई, ॲड.नादगोंडा, सुरेश गुलगुंजी, दत्ता जाधव, डॉ. शंखेश्वरी, हनुमंत पाटील, सुरेश लाटकर, तानाजी भोसले, सोमनाथ घेजी, दत्ता जाधव, संजय पाटील, राजू शंखेश्वरी, उदय देसाई, तुकाराम नाईक आदींसह स्थानिक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते..
Discussion about this post