आजरा – प्रतिनिधी,
संग्रामसिंह कुपेकर-
कार्यकर्ते घडायला पंचवीस वर्ष लागतात. मला चळवळीत येऊन पंचवीस वर्षे झाले आहेत. म्हणून माझे विचार पक्के आहेत. आम्ही भक्कमपणे राजेश पाटील यांच्या पाठीशी उभे आहोत.आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे राजेश पाटील यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवूया.
राजेंद्र गड्डयांनावर -
आम्ही सर्व सारासर विचार करून, सत्सक विवेक बुद्धीला स्मरून योग्य व्यक्तीच्या पाठीशी उभे आहोत.राजेश पाटील हे शेतकऱ्यांसाठी काम करणारे नेते आहेत.आपल्या भागामधे लोकशाही सदृढपणे टिकवायची असेल, तर राजेश पाटील यांना पुन्हा एकदा आमदार केले पाहिजे.पैशाच्या आमिषाला बळी पडू नका.किती दिवस मटनाच्या ताटाला आणि दारूचा घोटाला लाचार होणार ? म्हणून येत्या २० तारखेला आमदार राजेश पाटील साहेबांच्या पाठीशी उभे राहूया.
जयसिंग चव्हाण -
आगामी विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे.या निवडणुकीमध्ये खास करून तरुणांची ताकद दिसून येणार आहे.गावातील तरुणांनी शांतीमध्ये क्रांती घडवून आणावी व राजेश पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन जयसिंग चव्हाण यांनी केले.
राजेश पाटील –
तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे.पाच वर्षांमध्ये सर्वच कामे झाली आहेत असं नाही. उर्वरित राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी, या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्या. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा,आपल्या सर्वांची आजची उपस्थिती ही महायुतीचा विजय स्पष्ट करणारी आहे.
यावेळी, रमाप्पा करीगार, चंद्रकांत हासुरे, राचापाण्णा घेजी, हरिकाका नवाळे,परेशराम कांबळे, महाबळेश्वर चौगुले, जयकुमार मुन्नोळे, अभय देसाई, प्रवीण शिंदे, सदाशिव सावंत, तानाजी भोसले, सोमनाथ घेजी, लक्ष्मण तोडकर, अथर्व तोडकर, आदींसह प्रमुख पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते..
Discussion about this post