प्रतिनिधी धनेश बाळासाहेब कबाडे
संगमनेर लगत असलेल्या एका गावात 30 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे संबंधितावर पीडित महिलेच्या सासूने फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे . बलात्काराची घटना 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडली असून या संदर्भात पीडित महिलेच्या सासूने 8 नोव्हेंबर ला दिलेल्या फीर्यादीनुसार संगमनेर पोलिसांनी नामदेव मच्छिंद्र चव्हाण ( रा .महादेव वस्ती सुकेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला शौचासाठी घरामागील शेतात गेली असता तेथे आरोपी नामदेव चौहान यांनी बलात्कार केला . तसेच झालेला प्रकार कोणाला सांगितलं तर तुला मारून टाकील अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . दिवाळीत महिलेच्या सासूने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 234/2024 अन्वये भारतीय न्याय सहिता कलम 64(2)(ग)351(2) नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास शहर पोलिस करत आहे .
Discussion about this post