सोयगाव :
तालुक्यात सोयाबीन काढणीचा हंगाम ; रब्बी हंगामाला सुरुवात झालेली असून अंतिम टप्प्यात आला आहे. सावळदबारा परीसरात एकरी चार ते पाच क्विंटल सोयाबीन उतारा येत आहे. भावही कमी मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात असताना दिवाळीचा सणही साध्या पद्धतीने शेतकऱ्यांनी साजरा केला आहे . सोयाबीनला भाव चार हजार दर असल्यामुळे शेतकऱ्या चे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाचे
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे व्यापारी गावागावात जाऊन शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात सोयाबीनची खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने खरीप हंगामाची चिंता वाढल्याने बी बियाणे खत यासाठी शेतमालाची विक्री करीत आहेत. शेतकरी रक्ताचे पाणी करून शेतमाल पिकवतो. यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून एक रुपयाची आर्थिक मदत मिळाली नाही. त्यातच उतारा कमी येत असल्याने सोयाबीनवर
केलेला लागवड खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
फोटो ओळ : सोयगाव – सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्याची लगबग..
Discussion about this post