भीमराव केराम यांना प्रचंड मतानी विजय करा -पंकजाताई मुंडे.
सारथी महाराष्ट्राचा.
(ता.प्र) शे.मोईन /9850799154
किनवट :मला संघर्षाचा वारसा लाभलेला आहे. माझ्यामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे बघण्यासाठीच उत्सुकतेने आपण हजारोच्या संख्येने येथे आलात. महिलांची अलोट गर्दी जमली, लोकनेते मुंडे साहेबांचा वारसा हा काट्यावर चालणारा आहे, गादीवर बसणारा नाही. महायुतीच्या स्टार प्रचारक म्हणून लोकनेत्या पंकजा गोपीनाथराव मुंडे यांची भाजपाचे उमेदवार भीमराव केराम यांच्यासाठी आयोजित जाहीर
सभा बोधडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात दिनांक ११, ११, २४ रोजी संपन्न झाली. दरम्यान व्यासपीठावरून त्यांनी जनतेला संबोधित केले. पुढे बोलताना म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेने महिलांची आर्थिक अडचण संपवली परंतु तालुक्यात एखादा साखर कारखाना किंवा सोयाबीन उत्पादनावर कारखाना झाला तर शेतक-यांचे भले होईल, रोजगार उपलब्ध होईल,
जेणेकरून बेरोजगारी दूर होईल, मी ही मेहनत घेते, राजकारण सोपं नाही. वेळेवर जेवायला पण मिळत नाही. आमचा अवतार होतो पण स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची लेक आहे. संघर्ष जवळून पाहिला आहे. संत श्री भगवान बाबांच्या ही वाट्याला संघर्ष आला होता. त्यांनी देहाला यातना करून घेतली, तसेच सर्व महापुरुषांनीही संघर्ष केला, तसा स्वर्गीय मुंडे साहेबही संघर्षातून पुढे आले होते. बिगर चपलीचा प्रवास त्यांनी केला, दहावीपर्यंत त्यांना चप्पल भेटत नव्हती असा संघर्ष त्यांनी भोगला आहे. मी माझ्या वडिलांना संघर्ष करताना जवळून पाहिले आहे. पाच पाच महिने मुलांचे तोंड पाहायला त्यांना मिळत नव्हते भाजपा पक्ष वाढीसाठी मुंडे साहेबांनी खूप कष्ट घेत संघर्ष केला आहे. तो विसरु नका आणि येणा-या विधानसभा निवडणुकीत
कमळावर मतदान करून महायुती भाजपाचे उमेदवार भीमराव केराम यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी व्यासपीठावरून आपल्या भाषणातून केले..
यावेळी मंचावर उमेदवार भीमराव केराम, प्रदेश उपाध्यक्ष गजानन घुगे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष अॅड.
किशोर देशमुख, सुधाकर भोयर, महिला जिल्हाध्यक्षा संध्या राठोड, जिल्हा सरचिटणीस संदीप केंद्रे, माजी नगराध्यक्ष इसाखान, आनंद मच्छेवार, श्रीनिवास नेम्मानीवार, अनिल तिरमनवार पूनम दिक्षीत, सागर शिंदे, उषा धात्रक, भावना दिक्षीत, गंगुबाइ परेकार, प्रा. किशन मिरासे, बालाजी मुरकुटे, वैजनाथ करपुडे पाटील, बिभीषण पाळवदे बाबुराव केंद्रे, बालाजी भीसे, बंटी फड,विनोद भरणे, भगवान हुरदुखे, स्वागत अयानेनिवार,गोविंद अंकुरवाड, सुनील पाटील, सरपंच बालाजी भिसे शिवा क्यातमवार, भूषण येंबरवार,आदि उपस्थिती
होती.
सुरूवातीला किनवट विधानसभा निवडणूक प्रमुख बाबूराव केंद्रे यांच्या प्रस्तावनेनंतर जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या खोट्या आश्वासनावर कठोर टीका करीत महायुतीची भूमिका स्पष्ट केली.
Discussion about this post