प्रतिनिधी पांडुरंग गाडे..
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र येलवाडी गावामध्ये जंगी असं स्वागत करण्यात आले.
गावातील महिला भगिनींनी औक्षण करून स्वागत केले.
येलवाडी ग्रामपंचायत , येलवाडी विविध कार्यकारी सोसायटी, श्री संत भागीरथी माता देवस्थान, ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज देवस्थान, श्री येलेश्वर देवस्थान, भारतीय जनता पार्टी येलवाडी शाखा यांच्या वतीने उमेदवार श्री दिलीप आण्णा मोहिते पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी चेअरमन विद्यमान सरपंच खेड तालुका बाजार समितीचे संचालक श्री रणजीत गाडे पाटील यांनी केले. प्रस्ताविक मध्ये बोलताना सरपंचांनी सांगितले की आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र येलवाडी गावामध्ये 15 कोटींचा निधी येलवाडी गावासाठी दिला आहे.
आण्णांच्या माध्यमातून अनेक विकास कामे येलवाडी गावामध्ये झाली असून आणि अनेक कामांचे भूमिपूजन झाले असून ती कामे लवकरच चालू होतील. गावातून जास्तीत जास्त मतदान देण्याचा आश्वासन यावेळी सरपंच श्री रणजीत गाडे यांनी दिले.
जिल्हा परिषदेचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष श्री शरद राव बुट्टे पाटील यांनी यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. खेड आळंदी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार श्री दिलीप आण्णा मोहिते पाटील हे अनुभवी कार्यक्षम संसद पटू आमदार असून त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. आणि खेड आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी श्री दिलीप आण्णा मोहिते पाटील यांना घड्याळ या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे ही विनंती केली.
यावेळेस उमेदवार श्री दिलीप आण्णा मोहिते पाटील यांनी सांगितले की येलवाडी गावचे सरपंच श्री रणजीत गाडे यांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र येलवाडी गावांमध्ये अनेक विकास कामे मार्गी लागले असून. तीर्थक्षेत्र येलवाडी गावचे श्रद्धास्थान जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची कन्या श्री संत भागीरथी माता देवस्थान साठी त्यांचा कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही असा शब्द त्यांनी दिला.
येणाऱ्या 20 तारखेला अनुक्रमांक 2 नंबर ला घड्याळ या चिन्ह समोरील बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे उमेदवार श्री दिलीप आण्णा मोहिते पाटील यांनी केली.
या कार्यक्रमाच्या वेळी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आरपीआय, आणि मित्र पक्षाचे अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाळासाहेब गाडे यांनी केले व खेड तालुका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माजी सरपंच नितीन भाऊ गाडे यांनी आभार व्यक्त केले..
Discussion about this post