हिंगनघाट:- तीनवेळा आमदार व एकदा मंत्री राहिलेले अशोक शिंदे स्वगृही म्हणजे परत शिवसेना (उबाठा) मध्ये दाखल झाले आहेत. आज त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. स्वगृही आल्याचे समाधान वाटते, असे ते बोलताना म्हणाले. मुळात मी कट्टर शिवसैनिक वठाकरे परिवाराचा अनुयायी. हिंगणघाट व वर्धा जिल्ह्यात सेनेची बांधणी केली.
इथल्या लोकांचे प्रेम मिळाल्याने तीन वेळा निवडून आलो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिला आणि नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद लाभले. पुढे मात्र संवाद राहिला नाही. सेनेच्या काही मंडळींमुळे दुरावा आला. गैरसमज झाले. शांत बसलो. पण राजकीय पिंड म्हणून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथेही निराशा आली. म्हणून मग शिंदे यांच्या सेनेत गेलो. तिथे मी ही विधानसभा निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न केले, पण शेवटी कळले की गड्या आपलं गावबरं. म्हणून भेटी घेतल्या. उद्धव ठाकरे यांनी कोणताही किंतून ठेवता मला स्वीकारले.
आता आपल्याच घरात यायचे होते म्हणून अटीशर्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार, निवडून पण आणणार.जुने सोबती दुरावले होते, पण आता आपलेच घर म्हणून सर्व एकत्र राहू. जिल्ह्यात दौरे सुरू करणार, अशी भूमिका अशोक शिंदे यांनी मांडली.
Discussion about this post