प्रतिनिधी प्रशांत माने नारायणगाव :विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पुन्हा ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक शेटे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील पोलीस स्टाफ यांच्यामार्फत नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या दारू विकणाऱ्या तसेच जुगार व्यावसायिकांवर कारवाई करत नारायणगाव पोलीस स्टेशन तर्फे तब्बल 18 ठिकाणी अवैधरित्या दारू विक्रेत्यांवर छापा टाकून एकूण दोन लाख 97 हजार रुपये किमतीचे 926 लिटर दारू व वाहने पकडले असून 3 ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच अत्यंत घाणेरड्या जागेत सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या हातभट्ट्या उध्वस्त केले आहेत.
Discussion about this post