उबाठा गटाच्या शिवसेना किसान सेना परतूर तालुकाप्रमुखाचा आमदार लोणीकर यांच्या नेतृत्वात भाजपात जाहीर प्रवेश
विकास पालवे यांच्या पुढाकारातून शिवली सर्कल मधील शेकडो कार्यकर्त्यांचा आज आमदार लोणीकरांच्या नेतृत्वात भाजपात जाहीर प्रवेश
महिनाभरात सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश – आमदार लोणीकर यांना विजयी करण्याचा निर्धार
परतूर / प्रतिनिधी बबन खाडे
महाराष्ट्र राज्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामां मुळे झालेला सर्वांगीण विकास पाहता परतूर विधानसभा मतदारसंघातील मंठा व परतूर तालुक्यातील शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षातून गेल्या महिनाभरात जवळपास 5000 कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून. भारतीय जनता पक्षात प्रवेश होणाऱ्या कार्यकर्त्यांचा सपाटाच दररोज मंठा व परतुर तालुक्यात दिसून येत आहे.
परतूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाचे कीसान सेना तालुका प्रमुख कोंडीराम आकात उर्फ नाना यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. परतुर तालुक्यातील किसान सेना उबाठा शिवसेनेच्या सर्व शाखा बरखास्त करून हजारो शिवसैनिक उद्या भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करतील. असे यावेळी कोंडीराम आकात यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
याबरोबरच भाजपा नेते विकास पालवे यांच्या पुढाकाराने सेवली सर्कल मधील शेकडो कार्यकर्त्यांनी आज परतुर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यात ढगी तालुका जालना येथील सरपंच कृष्णा केंद्रे अशोक सदावर्ते राजू घुले गजानन चव्हाण मुंजा सानप शाम केंद्रे दीपक चव्हाण लक्ष्मण इप्पर भागवत केंद्रे रामा घुले मदन कायदे राजू प्रकाश घुले दशरथ बबनराव इलग गजानन घुले यांनी काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केला तर सोनदेव येथील सरपंच आबाजी पालवे दिनकर ढाकणे गजानन ढाकणे सोनाजी डोईफोडे समाधान ढाकणे नारायण ढाकणे बद्रीनाथ ढाकणे देविदास ढाकणे संतोष पालवे गणपत ढाकणे कृष्णा ढाकणे धनंजय ढाकणे प्रभाकर ढाकणे एकनाथ ढाकणे ज्ञानेश्वर ढाकणे नारायण ढाकणे रामेश्वर ढाकणे भानुदास ढाकणे दिनकर ढाकणे विष्णू शेजुळ बाबू ढाकणे केशव सोडून के योगेश ढाकणे भरत ढाकणे दिगंबर शेजुळ शरद शेजुळ लहू ढाकणे रामेश्वर ढाकणे सोनाजी डोईफोडे बाळासाहेब ढाकणे हरिभाऊ मुंडे भास्कर ढाकणे प्रदीप ढाकणे शेख रियाज देवानंद मुंडे सतीश पालवे रामदास पालवे माजी उपसरपंच गणेश ढाकणे राजेंद्र बाळाभाऊ ढाकणे सुरेश विश्वनाथ तळेकर दिगंबर शेजुळ विनायक घोडे कैलास माघाडे गजानन ढाकणे मंगेश शेजुळ केशव सोळुंके विष्णू बिडवे संदीप ढाकणे यांचा समावेश आहे.


Discussion about this post