141 Total Views , 1 views today



हवेली तालुका प्रतिनिधी – अनिल वाव्हळ – (8830251992 )
उद्याचा सुजाण नागरिक व प्रगतशील भारत हा आजच्या प्रत्येक शाळेतील वर्गातूनच घडत असतो.बालकांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करून ,परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडवून सुजाण नागरिक बनावे असे प्रतिपादन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस – बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.बालदिनानिमित्त त्यांनी सर्व बालकांना शुभेच्छा दिल्या.
सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले.विद्यालयातील उपशिक्षिका चित्रा हेंद्रे यांनी बालदिन विषयक गीत सादर केले. त्यानंतर निडबने मल्लप्पा,धोंडगे समर्थ
गायकवाड ज्ञानेश्वर ,काळदाते पृथ्वीराज
या विद्यार्थ्यांनी बालदिनानिमित्त
आपले मनोगत व्यक्त केले.
सतिश कोकाटे यांनी शिक्षक मनोगतात बालदिन साजरा करण्याचा उद्देश,बालदिनाचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, पर्यवेक्षिका माधुरी राऊत,सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्विनी सावंत यांनी केले.सूत्रसंचालन कोमल जायभाय
यांनी केले.तर आभार सविता पाषाणकर यांनी मानले..
Discussion about this post