




कैलासराजे घरत..
खारपाडा पेण..
बालदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पेण तर्फे
महात्मा गांधी वाचनालय पेण येथे “मेगा ड्रॉइंग कॉम्पीटिशन” आणि “फायरलेस कुकींग कॉम्पीटिशन” मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या..
रोटरी क्लब पेणच्या अध्यक्षा संयोगिता टेमकर मॅडम, उपाध्यक्षा मधुबाला निकम माजी अध्यक्ष श्री जयेश शहा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अरविंद वनगे (अण्णा) यांचा वाढदिवस, त्रिपुरारी पौर्णिमा असा दुग्धशर्करा योग होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी वाचनालय अध्यक्ष श्री.अरविंद वनगे (अण्णा) यांचा माजी अध्यक्ष शहा यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
महात्मा गांधी वाचनालय उपाध्यक्षा सौ. सपना नितीन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अण्णा वनगे यांनी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन करून आई वडिलांचे आपल्या जीवनातील स्थान किती महत्वाचे हे सांगितले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पेणचे माजी अध्यक्ष विजय शहा, मितेश शहा, रोहन मनोरे उपस्थित होते.
बीना शहा मॅडम आणि सुवर्णा पोवळे मॅडम यांनी फायरलेस कुकींग कॉम्पीटिशनचे परीक्षक म्हणून काम पाहिले. मेगा ड्रॉइंग कॉम्पीटिशनचे परीक्षक म्हणून भारती जैन मॅडम यांनी काम पाहिले.
यावेळी के इ एस लिटिल अँजेलस स्कूल, कॉर्मेल स्कूल आणि इतर स्कूल मधील जवळपास २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्फुर्त भाग घेतला होता. यावेळी पालक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी 3 ते 5 या वेळेत ही स्पर्धा भरविण्यात आली होती.
ड्रॉइंग कॉम्पीटिशनमध्ये इयत्ता तिसरी ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर आठवी ते दहावी विद्यार्थ्यांनी फायरलेस कुकींग कॉम्पीटिशनमध्ये भाग घेतला होता. इयत्ता दुसरी मधील ड्रॉइंग कॉम्पीटिशनमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस अदिती मते तृतीय क्रमांक ओमकार दुबे, द्वितीय क्रमांक प्रिया सिंह, प्रथम क्रमांक विधि म्हात्रे
इयत्ता तिसरी मधील ड्रॉइंग कॉम्पीटिशनमध्ये बक्षीस धैर्या म्हात्रे तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक द्रोण पाटील, प्रथम क्रमांक श्लोक पाटील, इयत्ता चौथी मधील ड्रॉइंग
कॉम्पीटिशनमध्ये बक्षीस श्रेयस पाडावे तृतीय क्रमांक, मेहेक म्हात्रे द्वितीय क्रमांक, प्रथम क्रमांक तीर्था पोटेकर, इयत्ता पाचवी मधील ड्रॉइंग कॉम्पीटिशनमध्ये बक्षीस तृतीय क्रमांक लक्ष पाटील, कला राकेश पाटील, द्वितीय क्रमांक
समीक्षा हंस आणि आयुषा रोगे, इयत्ता सहावी प्राची मनोहर पाटील, अविनाश शहा
कु.ओवी कैलास घरत इयत्ता पाचवी ब, कु.वैष्णवी सचिन गावंड इयत्ता सातवी ब
के इ एस लिटिल अंजेल्स स्कूल पेण यांनी देखील या स्पर्धेत भाग घेतला होता.
तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते पत्रकार श्री.कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी रोटरी क्लब ऑफ पेण यांनी राबविलेल्या शैक्षणिक
उपक्रमाचे कौतुक केले..
Discussion about this post